राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा गावभेट जनसंवाद दौरा सांगोला तालुक्यामध्ये सुरू आहे. गावोगावी वाड्यास्त्यावर जाऊन गावकऱ्यांशी ते त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील देखील आहेत. दिपकआबा गावभेट दौरा करत लोटेवाडी येथे आले असता त्यावेळी येथील सातारकर वस्तीवरील नागरिकांनी आषाढी एकादशी निमित्त किल्ले मच्छिंद्रगड येथून श्री मच्छिंद्रनाथांची पालखी पंढरपूरला लोटेवाडी ते अचकदानी मार्गे जाते. परंतु या रस्त्यांच्या दुतर्फा काटेरी चिलार वाढले असल्याचे दिपकआबांच्या कानी घातले. या काटेरी चिलारमुळे नागरिकांचे खूपच हाल होत आहे त्याचबरोबर महिला आणि विद्यार्थ्यांना देखील खूपच अडचणी येत आहेत.
त्यावेळी दिपक आबांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ ग्रामस्थांच्या समोरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेले चिलार काढण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि संबंधित प्रशासनाने देखील लगेचच कारवाही करून कवठोळीर कौठूळी पूल येथून जुनी लोटेवाडी, नवीन लोटेवाडी, सातारकरवस्ती ते अचकदानी तसेच श्री मच्छिंद्रनाथ पालखीच्या वाटेवर रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी चिलार तसेच अन्य काटेरी वनस्पती काढून पालखीला मार्ग मोकळा दिला. दिपकआबांच्या एका कॉलमुळे लोटेवाडी ते अचकदानी रस्त्यावर दुतर्फा वाढलेली चिलार काढल्यामुळे नागरिकांमधून उत्साह तसेच समाधान व्यक्त होत आहे.