एसटीतून महिलेचे सहा तोळ्यांचे दागिने लंपास!

इचलकरंजी – वाठार एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेचे ६ तोळे सोने चोरीला गेले.याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदरची घटना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली. पुनम सुनिल देसाई (वय ३३, रा. डांगे गल्ली, बत्तीस शिराळा, ता. शिराळा, जि. सांगली) इचलकरंजी ते वाठार बसने मी प्रवास करत होत्या.

त्यांच्या पर्स मधील सोन्याचा लक्ष्मीहार, राणीहार, नेकलेस असा एकूण सहा तोळे वजनाचे पावणेदोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून चोरले. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल कुंभार करीत आहेत.