आळते येथील महात्मा गांधी सामुदायिक शेती सोसायटी निवडणुकीत छत्रपती शाहू विकास आघाडी विजयी

हातकणंगले तालुक्यातील आळते येथील महात्मा गांधी सामुदायिक शेती सोसायटीच्या निवडणुकीत सत्तारूढ छत्रपती शाहू विकास आघाडी पॅनलने बाजी मारली आहे. छत्रपती शाहू विकास आघाडी पॅनलने ९ पैकी ७ जागांवर विजय मिळवला तर विरोधी पॅनेलला २ जागा जिंकता आल्या. सोसायटीच्या ९ संचालक पदाच्या निवडणुकीसाठी मतदान चुरशीने झाले आहे. मतदानानंतर लगेचच मतमोजणी झाली. संस्थेची अल्लमप्रभू डोंगरावर १३८ एकर शेती असून देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी १९५३ साली महात्मा गांधी सामुदायिक शेती सोसायटीस ही जमिन दिली.

संस्थेचे फक्त ५८ सभासद असून जिल्ह्यात अशी एकमेव सोसायटी असावी. संरथेची प्रत्यक्ष निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यापासून विलास कांबळे, सुरेश आळतेकर, अशोक आळतेकर, जालंधर कांबळे, आदिनी छत्रपती शाहू विकास पॅनलची धुरा सांभाळली तर संस्था बचाव पॅनेलची संतोष कांबळे, अंकुश कांबळे, संजय आळतेकर, सुकुमार कृष्णा कांबळे, अमित आळतेकर यांनी धुरा सांभाळली. या निवडणुकीत दोन पॅनेल एकमेकाच्या विरोधात उभे होते. निवडणुकीत सत्तारूढ पॅनेलचे प्रा. सुकुमार कांबळे, विजय कांबळे, दिलीप कांबळे, राहुल कांबळे, सुरज कांबळे, शांताबाई कांबळे, आशाबाई कांबळे तर विरोधी पॅनेलचे गणेश कांबळे, अरुण कांबळे हे विजयी झाले. निर्णय अधिकारी म्हणून एस. बी. नाईक यांनी काम पाहिले.