पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत तळंदगे ग्रामपंचायत हद्दीतील रेमंड कॉटन इंडस्ट्रीज कडून ग्रामपंचायत कर वर्षानुवर्षे दुर्लक्षित होता. तत्कालीन कार्यकारिणीने याकडे दुर्लक्ष केले होते मात्र लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांनी निकराने लढा उभारला आणि ६४ लाखांचा फाळा वसूल केला आहे. याला ग्रा.प. सदस्य शुभांगी कांबळे, सविता चौगुले, आयेशा मुल्लाणी, अर्चना माळी, विरेंद्र वाघमोडे, सुशांत शिंगाडे यांच्याबरोबर सर्व सदस्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोलाची साथ दिली आहे.
यामुळेच १८ वर्षां नंतर सन २०२३ ते२०२५ या दोन वर्षांचा ६४ लाखांचा घरफाळा एमआयडीसी विभागाकडे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील ५० टक्के म्हणजेच ३२ लाख रुपये ग्रामपंचायतीच्या तिजोरीत जमा होतील. तळंदगे गावच्या हद्दीत २५० कंपन्या आहेत. चालू कार्यकाळात ५० कंपनीच्या नोंदी वाढवल्यामुळे पुन्हा आवकही वाढेल शिवाय एकूण कराचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक कर परतावा मिळावा म्हणून ७५ टक्क्यांची मागणी करीत लढा देत आहेत.