हातकणंगले रेल्वे ब्रिजखालील रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात; वाहनधारकांमधून समाधान

इचलकरंजी हातकणंगले मार्गावरील रेल्वे ब्रिज खालील पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सध्या कामाला सुरुवात केल्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होऊ लागलेले आहे. पावसाळा संपला तरी वाहनधारकांना गुडघाभर पाण्यातून वाहने चालवावी लागत होती. त्यातच पाण्याचा निचरा करण्यासाठी काढण्यात आलेली ड्रेनेज ब्लॉक झाल्यामुळे पाणी तुंबून राहत होते.

तसेच लोखंडी सळई ठिकठिकाणी तुटल्यामुळे गाड्यांचे नुकसान होण्याबरोबर लहान मोठे अपघात देखील होत होते. त्या संदर्भात आवाज उठवल्यामुळे रेल्वे प्रशासन जागे झाले आणि दोन दिवसांपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केलेली आहे. गुरुवारी पूर्वेकडील भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्यात आली. तर उर्वरित काम हे लवकरच पूर्ण होणार आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे वाहनधारकांमधून समाधान सध्या व्यक्त होऊ लागलेले आहे.