काल विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे हातकणंगले विधानसभा राखीव मतदारसंघाचे मतदान शांततेत झाले. एकूण १०४९७ मतदानापैकी ८१७० मतदान झाले. मौजे वडगाव येथे एकूण मतदान ३०४६ पैकी एकूण २४४८ मतदान झाले. येथेही मतदान शांततेत झाले. हेरलेमध्ये १० केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. मौजे वडगांवमध्ये ३०४६ पैकी २४४८ मतदान झाले.
मतांची टक्केवारी ८०.३६ टक्के इतकी झाली. हेरले, मौजे वडगाव गावांमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्त्री पुरुष मतदारांनी उत्साहाने मतदान केले. हातकणंगले पोलीस ठाणे प्रमुख पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व एमआयडीसी पोलीस ठाणे प्रमुख सपोनि सुनील गायकवाड यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता. त्यामुळे मतदान केंद्रावरती कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.