दाक्षिणाच्य (South’s) सिनेमा त्यांच्या कथा आणि साऊथचे दमदार अॅक्शन सीन्स करणारे अॅक्टर्स, यांनी संपूर्ण देशाला भूरळ घातली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रिलीज होणारे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करत असल्याचं पाहायला मिळतं. बॉलिवूडला जणू आता साऊथ इंडस्ट्रीची भितीच जाणवू लागली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच आता साऊथच्या हाईएस्ट पेड अॅक्टरच्या नावाची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्यानं त्याच्या आगामी चित्रपटासाठी एवढी मोठी रक्कम मानधन म्हणून घेतली आहे की, जो आकडा ऐकून आपल्यालाच काय, बॉलिवूडवर कित्येक वर्षांपासून राज्य करणाऱ्या शाहरुख, सलमानलाही भोवळ येईल.
हे ऐकून तुमच्या डोळ्यांसमोर अल्लू अर्जुन , महेश बाबू , ऋषभ शेट्टी , विजय देवरकोंडा , नागार्जुन , विजय सेतुपती यांसारख्या अनेक अभिनेत्यांची नावं आली असतील. पण, सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता यांपैकी कुणीच नाही. आम्ही ज्या साऊथ अॅक्टरबाबत बोलत आहोत, त्याचं नाव आहे, तेलुगू सुपरस्टार पवन कल्याण
चाहत्यांनी पवन कल्याणला मोठ्या पडद्यावर पाहून बरीच वर्ष झालीत. एकेकाळी मोठ्या पडद्यावरचा नावाजलेला आणि नियमित दिसणारा चेहरा असलेला पॉवरस्टार, अशी पवन कल्याणची ओळख होती. पण, त्यानंतर पवन कल्याणनं राजकारणात प्रवेश केला आणि सध्या तो आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. त्याच्यावरच्या राजकीय जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे चित्रपट लांबणीवर पडत आहेत, ज्यामुळे कोट्यवधी रुपये गुंतवणाऱ्या निर्मात्यांवर दबाव वाढत आहे. अनेक चित्रपट अडकल्यामुळे, निर्माते पवन कल्याण सेटवर परतण्याची वाट पाहत आहेत. अखेर, अभिनेतानं अलीकडेच त्याच्या तीन चित्रपटांच्या निर्मात्यांना भेटून त्यांना लवकरच शूटिंग पूर्ण करण्यासाठी तारखा देण्याचं आश्वासन दिलं आहे.
‘उस्ताद भगत सिंह’साठी आकारलं भलंमोठ्ठ मानधन
Siasat.com च्या रिपोर्टनुसार, पवन कल्याणनं उस्ताद भगतसिंगसाठी 170 कोटी रुपयांची फी आकारली आहे. तेलुगू अभिनेत्याला संपूर्ण भारताबाहेरील चित्रपटासाठी दिलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम आहे. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, बराच काळ चित्रपटांपासून दूर असूनही, निर्मात्यांना पवन कल्याणच्या बॉक्स ऑफिसच्या ताकदीवर खूप विश्वास आहे.
पवन कल्याण तीन सिनेमांचं शूटिंग पूर्ण करणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता-राजकारणी पवन कल्याण लवकरच तीन चित्रपट पूर्ण करण्यास सहमती दर्शवली आहे, त्यापैकी हरि हरा वीरा मल्लू मे मध्ये पूर्ण होईल. तर ओजीचं चित्रीकरण जूनमध्ये नियोजित आहे. तर उस्ताद भगतसिंह याचं चित्रीकरण जुलैमध्ये सुरू होईल. तसेच, पवन कल्याण त्याच्या वेळापत्रकाबद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर एएम रत्नम, डीव्हीव्ही दानय्या आणि मैथ्री मूव्ही मेकर्स सारख्या निर्मात्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.