हार्दिक – नताशा घटस्फोटाची चर्चा ……

भारतीय क्रिकेट टी 20 वर्ल्ड कप टीमचा उप-कर्णधार हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक आणि पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हार्दिक – नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या दोघांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

हार्दिक कायम त्याचा खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो .पण गेल्या काही दिवसांपासून हार्दिक याच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी आल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. हार्दिक – नताशा यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.

सांगायचं झालं तर, रडिट युजरने दोघांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा देखील केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक – नताशा एकत्र राहात नसल्याची माहिती देखील समोर येत आहे. शिवाय नताशा हिने सोशल मीडियावर अशा काही गोष्टी गेल्या आहेत ज्यामुळे घटस्फोटाची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

हार्दिक याची पत्नी आणि नाताशा स्टेनकोविक हिने सोशल मीडियावरून ‘पांड्या’ नाव काढलं आहे. त्यामुळे हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला. एवंढच नाहीतर, नताशा हिने हार्दिक याच्यासोबत असलेले सर्व फोटो देखील डिलिट केले आहे. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून दोघांनी एकमेकांसोबत फोटो देखील पोस्ट केलेले नाहीत.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 4 मार्च रोजी नताशा हिचा वाढदिवस होता. पण हार्दिक याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्नीला शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. नाहीतर, हार्दिक कायम नताशा हिच्यासोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायचा.

सामन्यांदरम्यान कायम पतीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर असणारी नताशा यंदा दिसली नाही. त्यामुळे देखील घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. चाहत्यांमध्ये देखील हार्दिक आणि नताशा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलं नाही.