उंच हेझल,तरुण विराट आणि बंगळूर सुसाट

मध्यंतर संपून आय पी एल स्पर्धा उत्तरार्धात जात असताना अधिक चुरशीची होत चालली आहे… मुंबई संघाकडून रोहित अधिक तरुण (young) होऊन खेळत आहे आणि त्याच्याबरोबर स्पर्धा करीत बंगळूर संघाचा विराट अधिक तरुण होऊन खेळत आहे..परवा रोहितने दाखविले की, काही काळ शमीच्या झाडावर ठेवलेली त्याची अस्त्रे गंजून गेली नाहीत. ती त्याच तेजाने अजून ही चमकत आहेत… आज विराट ने पुन्हा दाखवून दिले की, त्याचा बॉटम हॅण्ड फ्लिक अजून ही पहिल्या सारखाच तरुण (young) आहे…

राजस्थान संघाकडून रजपूत लोकांचा संघर्ष आणि मैदानात कधी ही हार न मानण्याची वृत्ती अपेक्षित आहे…पण गेल्या तीन सामन्यात ते फक्त आत्मघात करीत आहेत हातात आलेला सामना गमवायचा कसा याचा वस्तुपाठ घालून देत आहेत..संघर्ष तर दूरच पण सलग आत्मघात करण्याची सवय त्यांना या स्पर्धेबाहेर घेऊन गेली ते सुद्धा मनाने कणखर असलेले राहुल द्रविड प्रशिक्षक असताना

गेल्या तीन सामन्यात त्यांना 9 या आकड्याने त्यांना फसविले आहे स्टार्क च्या शेवटच्या षटकात त्यांना जिंकायला 9 धावा हव्या होत्या आवेश च्या शेवटच्या षटकात 9 धावा आणि काल शेवटच्या 2 षटकात 18 धावा सरासरी 9 धावांची आणि तिन्ही सामन्यात पराभव एक गोष्ट सामायिक होती तिन्ही सामन्यात या स्थितीवर ज्युरेल आणि हेट मायर मैदानात होते.

बंगळूर संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला तेव्हा आज जोफ्रा आर्चर ने जुन्या काळातील कॅरेबियन गोलंदाजी कशी असेल याचे पहिल्या दोन षटकात प्रात्यक्षिक दाखविले… 150 च्या वेगाने टाकलेले चेंडू सॉल्ट आणि विराट यांना समजत नव्हते.. त्यांना काही चौकार सुदैवाने मिळाले..एका उसळत्या चेंडूवर एक अप्पर कट विराट ने चेंडूच्या जवळ जाऊन खेळली… पॉवर प्ले मध्ये 59 धावा करून मोठ्या धावसंखेकडे कूच केले…सांघिक 61 धावसंखेवर स्लॉग स्वीप करताना सॉल्ट बाद झाला…नंतर विराट आणि देवदत्त यांनी 51 चेंडूत 95 धावांची भागीदार केली…विराट सध्या काय तुफान फॉर्म मध्ये खेळत आहे…आपल्या 70 धावांच्या खेळीत त्याने ऑन ड्राईव्ह मारले..स्पिन विरूद्ध पूल मारले … स्ट्रेट ड्राईव्ह… आणि देशपांडे याच्या गोलंदाजीवर डीप मिड विकेट वर त्याचा ट्रेडमार्क बॉटम हॅण्ड फ्लिक मारून षटकार वसूल केला..त्याला उत्तम साथ दिली ती देवदत्त ने…चेंडू उशीरा खेळण्याची त्याची शैली त्याला कमी धोका पत्करून धावा जमविण्यास मदत करते..आज सुद्धा त्याने काही लेट कट करून थर्ड मॅन परिसरात काही चौकार वसूल केले…देवदत्त ला राजस्थान संघाच्या क्षेत्ररक्षकांनी सुद्धा मदत केली. तेराव्या षटकात हस रंगाच्या गोलंदाजीवर त्याचा जेल सुटला…ही आय पी एल स्पर्धा झेल सोडण्यासाठी सुद्धा गाजत आहे…प्रति सामन्यात ३ झेल सुटतात अशी आकडेवारी सांगते..जितेश आणि डेव्हिड यांनी 19 चेंडूत 42 धावा करून धावसंख्या 205 वर नेली..

206 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या राजस्थान संघाने सुरवात झोकात केली 52 धावांच्या सलामी नंतर पॉवर प्लेमध्ये 72 धावा लावून सामना जिंकण्याचे संकेत देखील दिले…आज सुद्धा वैभव सूर्यवंशी याने छोट्या खेळीत 2 षटकार मारले… 19 चेंडूत 49 धावा करणारा यशस्वी एकत्रफी समान जिंकून देईल असे वाटत होते….आखूड टप्प्याच्या चेंडूवर तो एकतर पुल खेळत होता..किंवा ऑफ स्टम्प बाहेर चेंडू कट करीत होता. ..पण पॉवर प्ले च्या शेवटच्या षटकात जे हेझल चे होते… 14 धावा आल्या असताना एक स्लो आखूड टप्प्याच्या चेंडूवर तो पूल करताना फसला आणि बाद झाला…नंतर नितीश आणि पराग यांना कुणाल ने बाद करून राजस्थान संघाला बॅकफूट वर ढकलले..पण 18 व्या भुवि च्या षटकात 22 धावा ज्युरेल याने मारून सामना राजस्थान संघाच्या बाजूने आणला होता..पण तिथे प्रोसेस फॉलो करणारा उंच हेझल मध्ये आला…त्याने टाकलेल्या 19 व्या षटकात फक्त 1 धाव दिली…आणि ज्युरेल याला बाद केले… इथे जतीन शर्मा याचे कौतुक करावे लागेल.. ज्यूरेल बाद होता हे फक्त त्यालाच समजले आणि त्याने रिव्ह्यू घेतला…त्याचा षटकात एका लेंथ बॉलवर आर्चर बाद झाला….आणि हातात असलेला सामना बंगळूर संघ घेऊन गेला…

हेझल फक्त शरीराने उंच नाही तर त्याची गोलंदाजीतील उंची सुद्धा तेवढीच आहे ऑफ स्टम्प वर चेंडू तो नेम धरून टाकतो फलंदाजांना बुचकाळ्यात टाकणारे आखूड टप्प्याचे चेंडू तो लिलया टाकतो..तुम्ही टेस्ट क्रिकेट मधील नावाजलेले गोलंदाज असला आणि प्रोसेस फॉलो केली तर 20/20 ची मैफिल तुम्ही रंगवू शकता हे ही स्पर्धा वारंवार दाखवते स्टार्क,आर्चर,बोल्ट,बुमराहा, सिराज प्रसिद्ध ही काही नावे. आणि अजून रबाडा यायचा बाकी आहे..