Kriti Sanon : कृती सेननला हवाय ‘असा’ जोडीदार

 बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. या वर्षाच्या सुरुवातीपासून कृती आपल्या चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे. ‘क्रू’ अभिनेत्री कृती सेनन सध्या आपला रुमर्ड बॉयफ्रेंड कबीर बाहियासोबतच्या डेटिंग रुमर्समुळे चर्चेत आहे. कृती सेनन नक्की कोणाला डेट करतेय याबद्दल तिने अद्याप काहीही खुलासा केलेला नाही. अशातच आता अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नव्या अपडेट्स समोर आल्या आहेत. अभिनेत्रीने आइडियल पार्टनर कसा हवा याचा खुलासा केला आहे. ‘क्रू’ अभिनेत्रीने आयुष्याचा जोडीदार कसा हवा हे सांगितलं आहे.

तसेच होणाऱ्या जोडीदाराकडून तिच्या असलेल्या अपेक्षांबद्दलही तिने भाष्य केलं आहे. फिल्म कंपेनियनला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री कृती सेननला विचारण्यात आलं की तिला आइडियल पार्टनर कसा हवा आहे. अभिनेत्री या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली,”मला माहिती नाही. मला जसा आइडियल पार्टनर हवाय तसा कोणी आहे की नाही हे माहिती नाही. आपण स्वत:वर खूप दबाव टाकतो मला असा मुलगा हवाय, तसाच मुलगा हवाय वगैरे. मला वाटतं जो योग्य असेल तो आयुष्यात येईल.

कृती सेननने आयुष्याचा जोडीदार कसा हवा याबद्दल खुलासा केला आहे. कृती सेनन म्हणाली,”जो मला आनंद देईल ज्याच्यासोबत माझा चांगला बॉन्ड होईल…जो कितीही वेळ माझ्यासोबत गप्पा मारू शकतो जो माझा आणि माझ्या कामाचा आदर करेल. या सर्व गोष्टी माझ्यासाठी खूप गरजेच्या आहेत. नात्यात प्रामाणिकपणा असावा. त्या व्यक्तीचा सेन्स ऑफ ह्यूमर चांगला असायला हवा. हा व्यक्ती काळजी घेणारा असावा. माझ्यासाठी त्याने वेळ काढायला हवा. प्रेम ही खूप सुंदर गोष्ट आहे. प्रेमात मर्यादा येत नाहीत.