शहरातील रस्त्यांच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारच्या तक्रारी होणार नाहीत याची पुरेपूर खबरदारी सर्वच मक्तेदारांनी
घ्यावी. त्याचबरोबर दिलेली सर्वच कामे मुदतीत पूर्ण करण्यात यावीत, अशा सुचना आमदार राहुल आवाडे यांनी संबंधित मक्तेदारांना दिल्या.
सध्या शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांबाबत काही तक्रारी महानगरपालिका (Municipal) प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने आम. राहुल आवाडे यांनी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचेअधिकारी, संबंधित कामाचे मक्तेदार यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले होते.
आम. आवाडे यांनी शहरात सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित मक्तेदारांकडून सविस्तर आढावा घेतला. बैठकीस महानगरपालिका (Municipal) शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता सार्वजनिकबांधकाम विभाग आर. व्ही. तोंदले, उपअभियंता एस. एस. पाटील, शाखा अभियंता पी. टी. मोरे, कनिष्ठ अभियंता के. सी. कांबळे, एस. जी. पाटील, एस. पी. शिंदे, सी. वाय. गुरव, बाजी कांबळे यांचेसह मक्तेदार महेश भोसले, डी. वाय. भोसले, शिवराज पाटील, बी. ए. कांबळे, राकेश कुकरेजा, सचिन कोळी आदी उपस्थित होते.