इचलकरंजीतील हॉटेल उपवनच्या रूम नंबर १०१ मध्ये मानसिक तणाव व व्यवसायात झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे अभिजित सुभाष पाटील याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत व्यावसायिक गेल्या १७ दिवसांपासून हॉटेल उपवनमध्ये वास्तव्यास होता. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. व्यवसायातील मोठे नुकसान आणि मानसिक तणाव सहन न झाल्याने मी हा टोकाचा निर्णय घेत आहे.
माझ्या अंत्यसंस्कारावेळी चितेला माझ्या जवळच्या मित्रांनी अग्नी द्यावा, असा मजकूर आहे. पाटील हे मूळचे इचलकरंजीतील असून त्यांनी देशातील विविध मोठ्या शहरांतील उद्योगात गुंतवणूक केली होती. हॉटेल उपवनमध्येही ते एकटेच राहत होते. शुक्रवारी रात्री कर्मचाऱ्यांनी रूमचा दरवाजा ठोठावला असता प्रतिसाद मिळाला नाही. व्यवस्थापनाने पोलिसांना कळवले. पाटील यांनी फॅनच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले.