इचलकरंजी शहरांमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र सध्या आपणास पहावयास मिळत आहे. या रस्त्यांची दुरुस्त करण्याची मागणी देखील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सध्या होऊ लागलेली आहे. कारण रस्त्यांमध्ये असणारे खड्डे यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होतानाचे चित्र दिसून येऊ लागल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. कृष्णा योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी ज्ञानेश्वर मंदिर (आमराई रोड) ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत रस्त्याची खुदाई करण्यात आलेली होती. ही जलवाहिनी टाकून चार-पाच महिने झाले तरी पण रस्ता दुरुस्त न केल्यामुळे रस्त्यांवरती खूप मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सेवा सदन, निरामय हॉस्पिटल गावगाव पोलीस स्टेशन आमराई रोडवरील शिक्षक कॉलनी , कामाक्षी रेसिडेन्सी मधील वाहनधारक, विद्यार्थी व पादचऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या गंभीर बनलेला आहे. त्यामुळे विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय ओमप्रकाश दिवटे यांना समक्ष भेटून हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती. त्याला अनुसरून इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी याबाबत त्वरित डांबरी पॅचवर्क चालू करण्याचे आदेश दिले आहेत.