भारत पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी करण्याचा निर्णय झाला असला तरी या दोन्ही देशांमधील वाद अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही. याच पार्श्वभूमीवर जगभरात गाजलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान पुरता घाबरला आहे. दरम्यानच्या काळात त्याने भारतावर अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परंतु भारताच्या मजबूत हवाई संरक्षण यंत्रणेपुढं त्याचं काहीही चाललं नाही. भारतीय सैन्याने हा प्रत्येक हल्ला हाणून पाडला. अशातच दहशतवादाच्या विरोधातील या लढ्यात अनेक देशांनी भारताची साथ दिली असताना, काही देश पाकिस्तानच्या बाजूने आहे. यात तुर्कीनेही भारताविरुद्ध आवाज उठवला आहे. शिवाय त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. जर तुर्कीने भारताशी सामना करण्याची चूक केली तर ते फक्त दोन दिवसांत संपू शकेल, अशी आकडेवारीच याची साक्ष देत आहे. किंबहुना मित्रदेश पाकिस्तानही त्याला यातून वाचवू शकणार नाही. हे बोलण्या मागचे नेमकं कारण काय? हे आपण जाणून घेऊया.
भारतीय सैन्य तुर्कीपेक्षा जास्त घातक
जर आपण अग्निशक्ती निर्देशांक पाहिला तर, भारत एकूण यादीत चौथ्या स्थानावर आहे, तर तुर्की नवव्या स्थानावर आहे. भारताचे लष्कर, हवाई दल आणि नौदल हे सर्व तुर्कीपेक्षा खूपच मजबूत आहेत. जर आपण हवाई शक्तीबद्दल बोललो तर, तुर्की भारताच्या निम्मीही ताकदवान नाही. भारताकडे एकूण 2229 विमाने आहेत. तर तुर्कीकडे 1083 विमाने आहेत. भारताकडे 513 लढाऊ विमाने आहेत. तर तुर्कीकडे 201 आहेत. भारताकडे हल्ल्यासाठी १३० लढाऊ विमाने आहेत. तर तुर्कीकडे असे एकही डेडिकेटेड एयरक्राफ्ट नाही. भारतीय हवाई दलाकडे 899 हेलिकॉप्टर आहेत. तुर्कीकडे 508 हेलिकॉप्टर आहेत. नौदलाच्या सामर्थ्याबद्दल बोलायचे झाले तर, भारताकडे 2 विमानवाहू जहाजे आहेत. तर तुर्कस्तानमध्ये एकही नाही. जर आपण पाणबुड्यांबद्दल बोललो तर भारताकडे 18 आणि तुर्कीकडे 13 पाणबुड्या आहेत.
भारताकडे 14 लाखांहून अधिक सैनिक, तुर्कीकडे फक्त 3 लाख 55 हजार
जर आपण निमलष्करी दलांबद्दल बोललो तर भारत क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. तुर्की 12 व्या क्रमांकावर आहे. भारताच्या निमलष्करी दलात 25 लाखांहून अधिक सैनिक आहेत. तर तुर्कीकडे फक्त एक लाख पन्नास हजार सैनिक आहेत. भारतीय सैन्याबद्दल बोलायचे झाले तर, 14 लाखांहून अधिक सैनिक सक्रिय आहेत, जे कर्तव्यावर तैनात आहेत. तर तुर्कीकडे असे फक्त 3 लाख 55 हजार सैनिक आहेत. अशा परिस्थितीत जर तुर्कीने भारताशी युद्ध केले तर ते जास्त काळ टिकू शकणार नाही.