तमिळनाडूतील चेन्नई आणि जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये मिचौंग या चक्रीवादळामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत केले आहे.या चक्रिवादळाचे परिणाम पाहता २०१५ च्या महापुराची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे.
चक्रीवादळ ‘मिचौंग’ दक्षिण आंध्र प्रदेश जवळ आल्याने IMD ने आंध्र प्रदेश आणि उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.रेल्वे आणि उड्डाणे रद्द झाल्याने वाहतूक सेवांवर गंभीर परिणाम झाला.
गेल्या २४ तासांत चेन्नईतील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहेचेन्नई आणि जवळपासच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.हवामान खात्याने प्रभावित जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.चक्रीवादळामुळे तामिळनाडू सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
चक्रीवादळाचे परिणाम पाहता तमिळनाडू सरकारने चेन्नईतील खाजगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना 5 डिसेंबरपर्यंत घरून काम करण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले आहे.पुरग्रस्त भागात बचावकार्यासाठी एनडीआरएफचे २५० जवान तैनात करण्यात आले आहेत. चेन्नई विमानतळावर पाणी साचल्यामुळे सकाळी ९.४० ते रात्री ११ वाजेपर्यंत कामकाज बंद ठेवण्यात आले होते.भुयारी मार्गात पाणी साचले असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
