हातकणंगलेतील बिरदेववाडी येथे विकासकामांचा शुभारंभ!

गावच्या सर्वांगीण विकासाठी गट-तट विसरून सर्वांनी एकत्रित आल्यास बिरदेववाडी गाव आदर्शगांव म्हणून नावारूपास येईल, असे मत माजी जि.प. सदस्य अरूणराव इंगवले यांनी व्यक्त केले.

बिरदेववाडी (ता. हातकणंगले) येथे विविध विकासकामांचा लोकार्पण व शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमास माजी जि.प.सदस्य अशोकराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी इंगवले म्हणाले की, बिरदेववाडी छोट्याशा गावचा सर्वांगीण विकासव्हावा यासाठी गावातील रस्ते, गटारी, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा कामांना प्राधान्य दिले आहे.

भविष्यातील पाणी व चारा टंचाईच्या नियोजनासाठी आपण आतापासूनच प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी किरण इंगवले सरपंच अजिंक्य इंगवले यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ३० लाख रुपयांच्या बिरदेववाडीकडे जाणाऱ्या रस्ता कामाचा शुभारंभ तर जि.प.शाळेतील शेड, जलजीवन अंतर्गत पाण्याची टाकी, खोत- धनगर गल्लीतील क्रॉक्रीट गटर या कामांचा लोकार्पण करण्यात आला.

याप्रसंगी तात्यासो हांडे, सरपंच संगीता वाघमोडे, उपसरपंच सतिश कागले, ए.एस शेळके, विजय नाईक, प्रदिप पाटील, अशोक नाईक, बाबासो खरात, शेवंता नाईक, जयश्री नाईक, सरिता धनगर, ग्रामसेविका वैजयंती ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.