हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा उद्धव ठाकरे गटाची मागणी!

सद्या निवडणुकीचे वारे सर्वत्र जोर धरत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा मतदार संघ आहे. शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघात कडवी झुंज दिली असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत येथील खासदारही निवडून आणला आहे. या मतदारसंघात शिवसेना पक्षाची ताकद व पक्ष बांधणे मोठी आहे.

त्यामुळे या मतदारसंघ इतर कुठल्याही दुसऱ्या पक्षाला न देता शिवसेना पक्षाकडेच ठेवावा अशी मागणी शिवसेनेचे हुपरी शहर प्रमुख राजेंद्र यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी गटाला सोडावा अशी मागणी करण्यात येत आहे.त्यामुळे शिवसैनिकांमध्ये ब्रह्मावस्था वाढत चालली आहे.

राष्ट्रवादीपेक्षा आपल्या पक्षाची ताकद व मोर्चे बांधणी मतदार संघात जोरात असल्याने हा मतदारसंघ पक्षाकडेच ठेवावा. गेली 19 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून शिवसेना वाढीसाठी झटणारे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी अशी शिवसैनिकांची मागणी आहे.