इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला तरीदेखील वस्त्रोद्योगातील कामगारांना सुधारित वेतन श्रेणी कधी लागू होणार याची प्रतीक्षा कामगार वर्गाला लागली आहे. सध्या मालकवर्ग नियमाप्रमाणे बोनस देत आहे.
परंतु किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यास तयार नसल्याने कामगारांची मोठी गोची झाली आहे.इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेमध्ये रूपांतर जून २०२२ मध्ये झाले. त्यामुळे वस्त्रोद्योगहीश्रेणी दोनमधून श्रेणी एकमध्ये आला आहे. त्यामुळे शासननियमाप्रमाणे कुशल, अर्धकुशल व अकुशल कामगारांच्या वेतनश्रेणीमध्ये बाद होणे गरजेचे होते. परंतु सदरची वेतन वाढीची अंमलबजावणी कामगार आयुक्त यांच्याकडून झालेली नाही.
सध्या कामगार संघटना व मालक यांच्यामध्ये झालेल्या समझोत्यानुसार मूळ वेतन व महागाई भत्ता घरून ल्याचे पीस रेटमध्ये रूपांतर करत यंत्रमाग कामगारांना पगार दिला जातो.महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सन २०१५ मधील परिपत्रकानुसार महापालिका हद्दीतील कामगारांना मूळ वेतन दहा हजार शंभर ते नऊ हजार रुपये देणे अपेक्षित होते. याबाबत कामगार संघटनांनी इचलकरंजी कामगार आयुक्त कार्यालयाकडे वारंवार मागणी करूनही कामगार आयुक्त कोणताही निर्णय घेत नसल्याचे दिसून येते.
तर पूर्वी नगरपालिका असताना श्रेणी एकचे असणारे किमान वेतन रुपये 9500 ते 8500 याप्रमाणेच वेतन दिले जात आहे परंतु महापालिका झाल्यानंतर सुधारित दर्जा वाढीनुसार दहा हजार शंभर रुपये ते नऊ हजार रुपये हे मूळ वेतन व महागाई भत्ता धरून होणाऱ्या वेदनाप्रमाणे रूपांतर करून अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
परंतु तशी अंमलबजावणी अद्याप इचलकरंजी शहरांमध्ये झाली नसल्याने कामगार वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. तरी दर्जा वाढीनुसार मिळणाऱ्या वेतनाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी इचलकरंजीतील कामगार वर्गातून जोर धरत आहे.