सध्या आगामी विधानसभा निवडणुका काही महिन्यांवरच येऊन पोहोचलेली आहे. अशातच अंबप येथील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते व संजय गांधी निराधार योजनेचे संचालक दिपक ढाले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.
दिपक ढाले यांनी भारतीय जनता पार्टी दलित मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष अशा अनेक पदांवर काम केले आहे. ज्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात काही मोजकेच कार्यकर्ते कार्यरत होते. त्यापैकीच एक दिपक ढाले कार्यरत होते आणि आजही ते भारतीय जनता पार्टीचे काम करीत आहेत.