दत्तात्रय मिरजकर पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहित मिरजकर

आष्टा, येथील दत्तात्रय मिरजकर अण्णा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ‘चेअरमन पदी रोहित मिरजकर – शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर, भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन अनिल शिंदे, आष्टा सेतू कार्यालयाचे व्यवस्थापक दत्तराज हिप्परकर यांच्या हस्ते रोहित मिरजकर यांचा सत्कार करण्यात आला.

 
यावेळी उपाध्यक्ष अश्विनी शिंदे, संचालक प्रकाश गोरे, आबासाहेब कदम, विजयकुमार जाधव, सुरेश पाटील, अरुण गायकवाड, केदार, आटुगडे, प्रेमचंद संत्रे, निलेश माळी, तानाजी ढोले, जयश्री हिरुगडे, अनिल शिंदे कार्यकारी संचालक शिवाजी खोत, सचिव उत्तम घबक, राजकेदार आटू गडे, विजय कटारे यांच्या सह सल्लागार मंडळाचे सदस्य, सभासद आणि नागरिक उपस्थित होते रोहित शिंदे म्हणाले संस्थेच्या  विकासासाठी योगदान देऊ व सदस्यांना कर्मचाऱ्यांना सहकार्य करू. दत्तात्रय हिप्परकर म्हणाले, प्रकाश मिरजकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली  पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. रोहित शिंदे चेअरमन पदाच्या माध्यमातून संस्थेला प्रगतीपथावर नेतील.