आष्टा इस्लामपूर मार्गावर ऊसवाहतूक करणाऱ्या ट्रॉलीस ओव्हरटेक करताना ट्रॅक्टर चालकाने अचानक वाहन उजव्या बाजूस चालवल्याने अपघात झाला. या अपघातात शिवशाही बसच्या प्रवासी बाजूच्या काचा फुटून सुमारे २१ हजारांचे नुकसान झाले.
आष्टा- इस्लामपूर मार्गावर डायमंड हॉटेलसमोर सांगली – पुणे शिवशाही एसटी बस क्रमांक एम. एच.०९ इ. एम. १४७८ ही जात असताना उसाने भरलेली ट्रॉली व ट्रॅक्टरच्या उजव्या बाजूने ओव्हर टेक करताना ट्रॅक्टर चालक रणजितसिंह कळंत्रे याने वाहन अचानक उजव्या बाजूस घेतले. यामुळे अपघात होऊन बसच्या ३ काचा फुटून २१ हजाराचे नुकसान झाले. याबाबत ट्रॅक्टर चालक रणजितसिंह कळंत्रे (रा. सातवे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध बाबासाहेब अब्दुल मुलाणी यांनी आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आष्टा पोलिस अधिक तपास करीत आहेत.