खा. मानेंनी ना. गडकरींशी भुयारी मार्गाबाबत केली चर्चा

बऱ्यापैकी अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झालेली पहायला मिळत आहे. पण यावर उपाययोजना म्हणून रस्त्यांची दुरावस्था भरून काढण्यासाठी रस्ते दुरुस्तीकरण देखील सुरु झालेले आहे.पेठ सांगली रस्त्याचे काम आष्टा येथे अंतिम टप्प्यात आले आहे. वाहनांच्या वेगासंदर्भात नियंत्रण नसल्याने हा नवीन रस्ताच सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. या मार्गावर चार ते पाच शाळेतील विद्यार्थी व तेथील रहिवाशी यांची रस्ता ओलांडून जाताना होणारी गैरसोय पाहता अपघात होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे बावची रस्ता येथेही बावची, गोटखिंडी, शिंदेमळा, नायकवडी मळा व लक्ष्मीबाई नायकवडी नगर व इतर मळे भागातून विद्यार्थ्यांना शाळेला येताना व ओलांडताना अवघड होत आहे.विद्याथ्र्यांच्या सुरक्षिततेच्या काळजीपोटी पालकांनी विद्यार्थ्यांचा सायकलवरून जाणे येणे बंद करून स्वतः शाळेत सोडायला व आणायला जात आहेत. 

 यावेळी तुकाराम हलगेकर, संदीप खोत, अजित भोसले व देवचंद्र आवटी उपस्थित होते. भुयारी मार्ग झाल्यास येथील अपघातांना काही प्रमाणात आळा बसेल. यासंदर्भात या मार्गावरील शाळातील मुख्याध्यापक, शिक्षक व शहरातील सामाजिक संघटना यांनी तहसीलदार व संबंधित विभागांना निवेदन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कार्यवाही न झाल्यास शिक्षक, पालक, विद्यार्थी, सामाजिक संघटना एकत्र येत आंदोलन छेडणार आहेत. 

नवीन रस्त्याचे काम चालू झाल्यापासून अंदाजे आठ ते दहा गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. तरी हीच परिस्थिती कायम राहू नये. यासाठी एम जी व्ही १९९८ सेवाभावी संस्थेकडून खासदार धैर्यशील माने दादा यांना दुसऱ्यांदा निवेदन देऊन गांभीर्य सांगितले. त्यांनी भुयारी मार्गाची मागणी केली आहे. या विषयाची खासदार माने यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सकारात्मक झाली आहे. सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून योग्य ते मार्ग काढू असे 
चर्चा सांगितले.