नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या जिंदाल कंपनीत लागलेली भीषण आग तिसऱ्या दिवशीही धुमसत असून, अद्यापही ती पूर्णतः आटोक्यात आलेली नाही. पॉलिफिल्म बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्चा माल आणि रसायनांमुळे आग अनियंत्रित झाली आहे. संपूर्ण परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात आकाशाच्या दिशेने झेपावत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक, ठाणे, मुंबई, मालेगाव महापालिका आणि इतर नगरपालिकांमधून 30 ते 40 अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवले गेले आहेत. पाणी आणि फोमच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
या आगीत जिंदाल कंपनीतील एक पूर्ण प्लँट आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे. कंपनीमध्ये वापरले जाणारे पाणी अपुरे पडत असल्यामुळे इतर कंपन्यांकडूनही पाणी मागवले जात आहे.नाशिक महापालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रदीप बोरसे यांनी सांगितले की,सर्वात धोक्याची बाब म्हणजे कंपनीच्या आवारात LPG टाकी आहे. टाकीचे तापमान वाढू नये यासाठी सतत पाणी व फोमचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या टाकीला जर आग लागली, तर मोठा स्फोट होऊन गंभीर अनर्थ घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग तिसऱ्या दिवशी सुद्धा धुमसतेय . आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जातायत . जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत दोन कामगार जखमी झाल्यास कळतंय . 30 ते 40 अग्निशमन दलाच्या गाड्या परिसरात दाखल झाल्या आहेत .
तब्बल 24 तास उलटल्यानंतरही आग आटोक्यात येत नसल्यामुळे आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून एनडीआरएफ तुकडीची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील एनडीआरएफ बेस कॅम्पशी संपर्क साधण्यात आला असून, गुरुवारी पहाटे दोन वाजेपर्यंत एनडीआरएफची तुकडी जिंदाल कंपनीत दाखल होणार आहे. ही कंपनीत आग लागण्याची दुसरी वेळ आहे. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आगीचा भीषण भडका उडाला. कंपनीत पॉलिफिल्म बनवण्यासाठी असलेला कच्चा माल व रसायनांमुळे आग वेगाने पसरली आणि ती नियंत्रणाबाहेर गेली. आज सलग तिसऱ्या दिवशही आग धुमसतेय.