मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला आज अचानक दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीचे दृश्य समोर आले आहेत. हे दृश्य पाहिल्यानंतर आग किती मोठी आहे याची जाणीव होतेय. मिळालेल्या माहितीनुसार, लोटमान्य टिळक टर्मिनस स्थानकात बुकिंग आणि वेटिंग हॉलमध्ये ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीनंतर पोलिसांनी सर्व प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर काढलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम शर्थीने सुरु आहेत
ही आग नेमकी कशामुळे लागली ते समजू शकलेलं नाही. पण सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आग अशी अचानक कशी लागले? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय. पोलीस आणि प्रशासनही या आगीमागील कारण शोधणार आहे. पण सध्या तरी परिस्थिती पूर्ववत करणं हे प्रशासनापुढील महत्त्वाचं आहे.