जम्मू काश्मीर येथील पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानचे कंबरडे मोडले. १०० हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करून जगाला भारताने तीन्ही दलांची ताकद दाखवली . हे सर्व आमच्या भारतीय सैनिकांचे शौर्यआहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वीरीत्या पार पाडत असताना दाखवलेले शौर्य संयम यांच्या सन्मानार्थ व सैनिकांचे मनोबल वाढावे म्हणून खानापूर शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीत हजारोंच्या संख्येने सर्व जाती धर्मातील , गटातील लोकांनी आम्ही एक आहोत असा संदेश देत उस्फुर्तपणे हजेरी लावली . ही रॅली एसटी स्टँड येथील गणपती मंदिरापासून हनुमान मंदिर , जुनी बाजारपेठ, तासगाव रोड , श्री राम मंदिर चौक अशी काढली . श्री राम मंदिर चौकात भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक करत सैन्याचे मनोबल वाढावे यासाठी आम्ही सर्व एक आहोत , असा संदेश देणारी भाषणे झाली. यावेळी ऑपरेशन सिंदूर राबवताना काही जवान विरगती प्राप्त झाले त्यांना श्रद्धांजली वाहिली . राष्ट्र गीताने यात्रेची सांगता करण्यात आली.
खानापूर येथील तिरंगा रॅलीस उस्फुर्त प्रतिसाद
