शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या निकटवर्तीयाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठ्या पदावर वर्णी लागली आहे. आनंद गोयल शिवसेनेच्या संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आनंद गोयल यांनी विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारे यांच्या समर्थनात बॅनरबाजी केली होती. अंधारेंनी पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी गोयल यांनी होर्डिंग लावले होते.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी इन्कमिंग पाहायला मिळत आहे. काही आजी-माजी नगरसेवकही नाना भानगिरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते आणि जुने शिवसैनिक आनंद गोयल यांची पुणे शहर संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दिनांक 24 मे 2025 रोजी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.
आनंद गोयल हे अलीकडेच शिवसेना -उद्धव ठाकरे गट सोडून शिवसेनेत शिंदे दाखल झाले होते. प्रमोद नाना भानगिरे यांनी विश्वास व्यक्त केला की आनंद गोयल आपल्या कार्यातून आणि प्रचार-प्रसाराच्या माध्यमातून शिवसेनेला पुणे शहरात नवीन उंचीवर घेऊन जातील व समर्पित कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संघटनेला भक्कम आधार देतील.