विट्यात सदनिकांच्या नळजोडण्यांना गळती

विटा,खानापूर तालुक्याचे मुख्यालय असलेल्या विटा शहरामध्ये पोलिस वसाहत म्हणून गेल्या अकरा वर्षापूर्वी सदनिका बांधण्यात आलेल्या आहेत .पण जवळपास सर्वच सदनिकांमधील नळजोडणीच्या पाईप खराब झालेल्या आहेत .

महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्यावतीने पोलिस कल्याण निधीतून विट्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी २०१४ साली एकूण चार मोठया इमारती उभारण्यात आल्यात. यांत एकूण ५१ सदनिका आहेत . या चारही इमारतीमध्ये रस्ते व इतर सुविधा आहेत . बांधकाम चांगल्या दर्जाचे आहे. परिणामी गळती नाही. मात्र नळजोडणीच्या पाईप खराब झाल्याने पाणी ठिपकत असल्याची तक्रार आहे.