आटपाडीत औटपोस्टला राहण्याची नाही सोय

तालुक्यात आटपाडी येथे सुसज्ज पोलीस स्टेशन , तर दिघंची , खरसुंडी आणि करगणी येथे पोलीस औटपोस्ट आहेत. औटपोस्टच्या ठिकाणी राहण्याची सोय नाही आटपाडी येथे नवीन इमारतीत स्वतंत्र कक्ष , आरोपींना ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे. पोलीस स्टेशननजीकच पोलीस कॉलनीत २८ सदनिका आहेत . राहण्याची व्यवस्था झाली आहे. दिघंची , करगणी आणि खरसुंडी येथे स्वतःच्या मालकीचे पोलीस औटपोस्ट आहे. परंतु निवास्थान स्थान नाही . औटपोस्टला कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आटपाडी येथूनच ये-जा करावी लागते.