ग्रामीण भागातील पैलवानांना राज्य पातळीवर चमकता यावं यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आणि सांगली जिल्हा शहर तालीम संघाच्या वतीने विटा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगली जिल्हा निवड चाचणीचे आयोजन केलेल आहे. ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्याचबरोबर खानापूर तालुक्यात हि स्पर्धा प्रथमच होत आहे. आजपर्यंत कुस्ती क्षेत्राला काहीतरी आम्ही देणे लागतो या उद्देशाने हि स्पर्धा आयोजित केली आहे आपल्या खानापूर तालुक्याची उंची सांगली जिल्ह्यात वाढवण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे.
महाराष्ट्र केसरीच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील पैलवान सांगली जिल्ह्यातील पैलवान चमकावेत महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी यासाठी आम्ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करत आहे असे पै. सत्यजित (भैय्या) पाटील यांनी सांगितले. पै. सत्यजित (भैय्या) पाटील श्री. मंथन (नाना ) मेटकरी व मित्र परिवारातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. हि स्पर्धा शनिवार दिनांक 18 व रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी साळशिंगे रोड व्हीजन सिटी समोर संस्कार लॉन विटा या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे.