प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या हंगामासाठी झालेल्या लिलावात पुन्हा एकदा पैशांचा जबरदस्त वर्षाव पाहायला मिळाला. अनेक मोठ्या स्टार्सवर कोटींची बोली लागली, तर काही दिग्गजांना अपेक्षेपेक्षा कमी किंमत मिळाली. पहिल्या दिवसाच्या लिलावात कोणते खेळाडू सर्वाधिक महागडे ठरले, यावर सर्वांची नजर होती.
या लिलावात सर्वाधिक किंमत मिळवणारा खेळाडू ठरला मोहम्मदरेजा शादलू. गुजरात जायंट्सने त्याच्यासाठी तब्बल 2.23 कोटी रुपये मोजले. मागच्या हंगामात हरियाणा स्टीलर्ससाठी खेळताना 139 पॉइंट्स मिळवत त्याने संघाच्या विजयानात मोलाची भूमिका बजावली होती.
दुसऱ्या स्थानावर राहिला रेडिंग स्टार देवांक दलालने बाजी मारली. त्याला बंगाल वॉरियर्सने 2.205 कोटी रुपये देत संघात घेतलं. देवांक हा PKL 11 मध्ये सर्वाधिक रेड पॉइंट्स मिळवणारा खेळाडू होता. त्याच्या खात्यात 301 पॉइंट्स जमा होते.
आशु मलिक या अनुभवी प्लेयरवर दबंग दिल्लीने आपला FBM कार्ड वापरत त्याला पुन्हा संघात घेतलं आणि त्यासाठी 1.90 कोटी रुपये खर्च केले. आशु 2021 पासून दिल्लीसाठी खेळतोय आणि त्याची कामगिरी सातत्याने प्रभावी राहिली आहे.
अंकित जागलान या डिफेंडरवर पटना पाइरेट्सने विश्वास दाखवत 1.573 कोटी रुपये खर्च केले. त्याच्या डिफेन्स स्किल्समुळे तो लिलावात चौथा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला.
पाचव्या क्रमांकावर आहे अर्जुन देशवाल, ज्याला तमिल थलाइवाजने 1.405 कोटी रुपये देऊन संघात घेतले. जयपूर पिंक पँथर्ससाठी सातत्याने चांगली कामगिरी करणारा अर्जुन, आता पहिल्यांदाच दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसेल.
मोहम्मदरेजा शादलू – 2.23 कोटी (गुजरात जायंट्स)
देवांक दलाल – 2.205 कोटी (बंगाल वॉरियर्स)
आशु मलिक – 1.90 कोटी (दबंग दिल्ली)
अंकित जागलान – 1.573 कोटी (पटना पाइरेट्स)
अर्जुन देशवाल – 1.405 कोटी (तमिल थलाइवाज)