आटपाडी (Atpadi) एसटी डेपोला प्रवाशांच्या सुखकर सोयीसाठी राज्य शासनाकडून पाच नवीन एसटी गाड्या मिळाल्या आहेत. या गाड्यांचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते विनायककाका पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष जयवंतराव सागर, आटपाडी तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले , चंदू काळे, विष्णू अर्जुन , अनिल हाके उपस्थित होते. यावेळी पडळकर गटाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .
हा कार्यक्रम सेवाशक्ती एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आयोजित केले होता . नवीन पाच एसटी मिळाल्याने आटपाडी आगारातून लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा प्रवास निश्चितच सुखकर होणार आहे.