आटपाडी आगारात पाच नवीन बस दाखल झाल्या . सोमवारी या नवीन बसचे स्वागत आणि लोकार्पण सोहळा दोन वेळा झाला. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी जोरदार शक्ती प्रदशर्न करीत लोकार्पण केले .
आटपाडी आगारात शिवसेना आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत नूतन बस लोकार्पण कार्यक्रम सकाळी आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी भाजपचे
जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर , जयवंत सरगर , विष्णू अर्जुन , विनायक पाटील, चंद्रकांत काळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रॅली काढली . नूतन बसचे लोकार्पण करत कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, आगरप्रमुख राहुल देशमुख दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत नूतन बसचे लोकार्पण झाले. चालकांच्या हाती बसच्या चाव्या सुपूर्द केल्यानंतर मान्यवर बसमध्ये बसले. वाजतगाजत आटपाडी आगारातून बसस्थानकमार्गे नूतन बस पुन्हा आगारात फेरी मारून परत आल्या. आमदार सुहास बाबर , तानाजीराव पाटील , दत्तात्रय पाटील आणि अनेक कार्यकर्त्यांनी नूतन बसच्या प्रवासाचा आनंद लुटला .
दरम्यान नूतन बस लोकार्पण सोहळ्यच्या निमित्ताने राज्यतील सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन पक्षातील खानापूर – आटपाडी तालुकयातील प्रमुख नेत्यांच्या मधील श्रेयवादाची लढाई आणखी तीव्र झाल्याचे दिसून आले.