एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित असणाऱ्या द मोबाईल स्पेस या महाराष्ट्रातील नामवंत आणि झपाट्याने वाढ होणाऱ्या मोबाईल रिटेल कंपनीच्या विटा शाखेचा शुभारंभ रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न झाला. मायणी रस्त्यावरील संगम मेडिकल समोर सुरू करण्यात आलेल्या द मोबाईल स्पेस या मोबाईल शॉपचे माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील सुहास भैया बाबर आणि ॲड. वैभवदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटनानंतर द मोबाईल स्पेस या शॉप मध्ये ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली. द मोबाईल स्पेस या मोबाईल शॉपचे मालक अजित पांडकर यांनी आपल्या शॉपच्या माध्यमातून दिलेल्या ऑफर्स ग्राहकांचे प्रमुख आकर्षण बनल्याचे पाहायला मिळाले.