जवळा येथे अवैध वाळू उपसा; ट्रॅक्टर – ट्रॉली जप्त

सांगोला , जवळा (ता. सांगोला ) गावच्या हद्दीतील कोरडा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा सुरु असलेल्या ठिकाणी सांगोला पोलिसांना मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ५ लाख रुपये किमतीचा १ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सद्दाम रसूल नदाफ यांनी १६ जून रोजी तुकाराम नानू सावंत (वय ५२,रा. जवळा,ता. सांगोला ) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की,१५ जून रोजी पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी सूचना दिल्याप्रमाणे पोलिसांनी जवळा गावच्या हद्दीतील कोरडा नदीपात्रात अंबिका वस्ती बंधाऱ्याजवळ एक व्यक्ती ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साह्याने बेकायदेशीर वाळू उपसा करत असताना पकडला.
ट्रॅक्टर – ट्रॉलीसह चालकाला जागीच पकडून सांगोला पोलिस ठाण्यात आणले.
ही कामगिरी पोलिस हवालदार बोधगिरे ,पोलिस हवालदार गोडसे,पोलिस शिपाई वाघमोडे,सद्दाम नदाफ यांनी केली.
सोहळा यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय शास्त्रे आणि माता-पालक यांचे अनमोल सहकार्य लाभले.