मुलं शैक्षणिक गुणवत्तेने चमकतात , त्यांच्या पाठीशी निश्चितच पालक असतात . त्याहीपेक्षा मातापालक फार महत्वाचा घटक आहे. जे २४ तास घर-कुटुंब सांभाळून असतो त्याच घरातील गुणवंत विध्यार्थी जगात भरारी घेतो . त्याला प्रज्ञेचे पंख देण्याचे काम पुरुष पालकही करतात .अशा अजिंक्य कांतीलाल कारळे या पाल्यपालकाचा आम्ही सत्कार केला याचबरोबर इतर गुणवंत पाल्य -पालकांचाही सत्कार केला. अशी आमची दिघंचीची सेवानिवृत्ती बहुद्देशीय सेवासंस्थाही धन्य झाली असे भावनिक उदगार संस्थेचे उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्ती शिक्षण विस्तार अधिकारी हणमंतराव गुरव यांनी काढले .
ते आटपाडी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी बोलत होते . यावेळी गुणवंत पाल्य आणि पालकांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रावसाहेब शेटे , जे. पी. सावंत , नामदेव ऐवळे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष उत्तम मोरे म्हणाले , ही आमची सेवानिवृत्तांसाठी आहे. तशीच होतकरू विध्यार्थ्यांसाठीही आहे, घोंगडेसर. म्हणाले मुलांच्या गुणवत्तेत माता पालकांची भूमिका मुख्य आणि महत्वाची असते. अजिंक्य कारळे हा भविष्यात शास्त्रज्ञ होऊ शकेल . यावेळी पालक कांतीलाल कारळे , संतोष मोरे, महादेव मोरे, दादासो पवार , तुकाराम आटपाडकर , ज्ञानोबा ढोक आदी गुणवंत पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सूर्यभान भिसे, अरुण मोरे, बलराम पाटील , सुभाष ससाणे , औदुंबर कुलकर्णी , फक्कड टिंगरे , मेजर नामदेव यादव , नामदेव ढोले , यशवंत मोरे, पांडुरंग शेरकर , बाळासाहेब रणदिवे , माणिक तरसे जगन्नाथ पाटील , दत्तात्रय कदम उपस्थित होते. आभार संस्थेचे सचिव अशोक जमदाडे यांनी मानले. सूत्रसंचालन संस्थेचे खजिनदार आर. के. ऐवळे यांनी केले.