आटपाडी घरफोडीत ४७ हजारांचा ऐवज लंपास

आटपाडी;शहरातील आंबेबन मळा येथे चोरटयांनी घरफोडी करत सुमारे ४७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २४ संप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी प्रवीण अशोक सूर्यवंशी यांनी पोलीस ठाण्यात फ़िर्याद दिली आहे. फिर्यादी प्रवीण सूर्यवंशी यांचे कुटुंबीय रात्री घराचे समोरील दरवाजास कडी लावून झोपले होते. पहाटे त्यांची आजी सोनाबाई व वडील यांनी प्रवीण याना जागे केले. सोनाबाईंनी सांगितले की , झोपेत असताना अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या मोहनमाळेला हिसका मारून नेली. चोरीस गेलेल्या मालामध्ये ३५ हजार रुपयांची पाव तोळा वजनाची सोन्याची बोरमाळ व १२ हजार ५०० रुपयांची रोकड असा एकूण ४७ हजार ५०० रुपयांचा ऐवज आहे.