संपूर्ण महाराष्ट्रचे अध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र पंढरपूरमध्ये आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सूरु आहे. लाखो वारकरी टाळ -मृदूंगाच्या गजरात आणि ‘जय हरी विठ्ठल ‘ च्या जयघोषात विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत असतात . सांगोला महाविद्यालयासमोरून देखील अनेक दिंड्या पंढरपूरला जात असतात . शुक्रवार दि . ४ जुलै रोजी सांगोला महाविद्यालय सांगोला (Sangola), राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आषाढी वारी -२०२५ ” स्वच्छ वारी ,स्वास्थ वारी, निर्मल वारी , हरित वारी “२०२५ या उपक्रमंतर्गत वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील स्वयंसेवक / स्वयंसेविका ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा समजून वारकऱ्यांची सेवा केली. या मोहीम मध्ये महाविद्यालयामध्ये आलेल्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी अल्पोपहार सोबत चहापाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. तसेच दिंडी थांबलेल्या ठिकाणची स्वच्छता करण्यात आली. केळीच्या साली, प्लास्टिक पिशव्या , पाण्याच्या बाटल्या व इतर कचरा संकलन केले गेले. सदरील कार्यक्रम हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला . यावेळी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले , कार्यलयीन अधीक्षक श्री . विलास माने, डॉ. राम पवार कॅप्टन संतोष कांबळे , प्रा . वासुदेव वालेकर , डॉ. नवनाथ शिंदे , डॉ. मालोजी जगताप , प्रा. संतोष लोंढे, डॉ. महेश घाडगे महाविदयालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाकडून आषाढी वारीनिमित्त स्वच्छ वारी -निर्मल वारी -हरित वारी उपक्रम संपन्न
