पोक्सो कायदा विषयी मार्गदर्शन शिबीर उत्साहात

हातकणंगले तालुका विधी सेवा समिती, इचलकरंजी, दि. इचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजी व डी.के.टी.ई. सोसायटीचे इचलकरंजी हायस्कूल अॅन्ड ज्युनियअर कॉलेज इचलकरंजी यांचे संयुक्त विद्यमानाने पोक्सो (POCSO) कायदा (लैंगिक गुन्हापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२) व बेटी पढाओ, बेटी बचाओ या विषयी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करणेत आले होते.जिल्हा न्यायाधीश जे. एल. गांधी यांचे मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम आयोजित करणेत आला. सदर कार्यक्रमांस पाचवे सह. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कु. एम. एस. गावडे, यांनी शाळेतील विद्यार्थिनींना पोक्सो कायदा (लैंगिक गुन्हापासून बालकांचे संरक्षण अधिनियम- २०१२) याबाबत मार्गदर्शन केले. तसेच बेटी पढाओ, बेटी बचाओ याबाबत अॅडव्होकेट आरती अरूण खड्ड यांनी याबाबत शाळेतील विदयार्थिनींना याबाबत मार्गदशन केले. 

सदर कार्यक्रमाकरीता दि इचलकरंजी बार असोसिएशन, इचलकरंजीच्या महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर, अॅड. विशाखा कचरे, डी. के. टी. ई. सोसायटीचे डी. वाय. कांबळे, बी. एम. थोरवत, तसेच हातकणंगले तालुका विधी सेवा समितीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिरजकर व अभिजीत माने उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. एस. पी. लोटके यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार सुहास पोवळे यांनी मानले. इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्य, डी. के. टी. ई. सोसायटी, इचलकरंजी हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी प्रयत्न केले.