ग्रामपंचायतीसमोर कर वसुलीचे नेहमीच मोठे आव्हान असते. वसुली कमी झाल्यास थेट परिणाम स्थानिक विकास कामांवर होत असतो. त्यामुळेच वांगी तालुका कडेगाव ग्रामपंचायतने कर वसूल व्हावा यासाठी अफलातून योजना सुरू केली आहे.
मार्च अखेर थकबाकी पूर्ण करणाऱ्यांचा लकी ड्रॉ काढला जाईल. त्यातून तीन विजेत्यांना सोन्याची कर्णफुले बक्षीस दिली जातील. वांगी ग्रामपंचायतची मार्च 2024 अखेरपर्यंत एकूण एक कोटी चार लाख कर थकबाकी आहे. मात्र कितीही प्रयत्न केले तरी चाळीस टक्केच कर वसुली होते.
तर थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडले गाळे सील केले तरी काहीही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. कर भरण्यासाठी फार जबरदस्ती करायला लागू नये आणि स्वखुशीने लोकांनी पाणीपट्टी, घरपट्टी भरावी या विचारातून कर वसुली सुवर्ण बक्षीस योजना ग्रामपंचायतीने ही शक्कल लागू केली आहे.