ब्रेकिंग न्यूज: आज वाळू तस्करांचा पथकावर हल्ला! अधिकाऱ्याला मारहाण

वडियेरायबाग येथे महसुलाच्या पथकावर हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वाळू तस्करांवरील कारवाईदरम्यान थेट मंडल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. मारहाण केल्यानंतर मारहाणी नंतर वाळू तस्करांनी वाळूच्या ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून त्यांनी पलायन केलं आहे. वडियेरायबाग येथील येरळा नदीपात्रात हा प्रकार घडला आहे. या मारहाणीनंतर मोठी खळबळ माजली आहे.

याप्रकरणी आकाश उर्फ धुळदेव शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यांच्यावरती मारहाण तसेच शासकीय कामा बाबतीत अडथळा निर्माण करण्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. रामचंद्र महाडिक या मंडल अधिकाऱ्याने याप्रकरणी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग येथे महसूलच्या पथकावर हल्ला झाल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. वाळू तस्करांवरील कारवाईदरम्यान मंडल अधिकाऱ्याला मारहाण केल्याची फिर्याद चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कडेगांव मंडल अधिकारी रामचंद्र दत्तात्रय महाडिक आणि तेथील तलाठी यांचे दक्षता पथक आज शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कडेगाव तालुक्यातील येरळा नदीच्या पात्रापाशी दाखल झाले.

या ठिकाणी सोनालिका कंपनीचा नंबर नसलेला निळा ट्रॅक्टर होता. तिथे अवैध्यरित्या वाळू चोरी चालू असताना मंडल अधिकाऱ्याच्या पथकाने ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न केला यावेळी वडियेरायबाग येथील आकाश उर्फ धुळदेव तानाजी शेळके याने मारहाण केली तसेच त्याच्याबरोबर असणाऱ्या अज्ञात तरुणाने नऊ हजार किमतीची वाळू चोरून नेली.

मंडल अधिकारी महाडिक यांनी मारहाण केल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याबाबत दोघांविरोधात चिंचणी वांगी पोलिसात फिर्याद दिली आहे