यंदाच्या वर्षी सर्वाधिक कमाई फक्त याच चित्रपटाची…..

कोरोनानंतर  प्रेक्षकांनी बाॅक्स आॅफिसकडे पाठ फिरवली. कोरोनानंतर रिलीज होणार जास्त चित्रपट हे फ्लाॅप जाताना दिसले. विशेष म्हणजे मोठ्या मोठ्या कलाकारांचे चित्रपट देखील फ्लाॅप गेले. अनेक चित्रपट चित्रपट रिलीज करण्यासही घाबरताना दिसले. 2023 हे वर्षे बाॅलिवूड चित्रपटांसाठी अत्यंत खास आणि मालामाल करणारे ठरले. एका मागून एक चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसले. शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट 2023 सुरूवातीला रिलीज झाला आणि या चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी केली.

केरला स्टोरी केरला स्टोरी या चित्रपटाला सुरूवातीला प्रचंड विरोध झाला. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर धमाका बघायला मिळाला. मात्र, बजेटच्या मानाने कमाईमध्ये पठाण या चित्रपटाला द केरळ स्टोरी या चित्रपटाने मागे टाकले. द केरळ स्टोरी चित्रपटाचे बजेट हे साधारण 30 कोटी होते. चित्रपटाने 238.27 कोटींची कमाई केली. यानुसार रिटर्नमध्ये 694.23 मिळाले.

गदर 2 दुसरा नंबर हा सनी देओल याच्या गदर 2 चित्रपटाचा आहे. गदर 2 चित्रपटाचे बजेट हे 75 कोटी होते. या चित्रपटाने एकून 525.50 कोटींची कमाई केली. चित्रपटाला 600.66 टक्के परतावा मिळाला आहे. यानुसार गदर चित्रपटा दुसऱ्या नंबरवर आहे.

अॅनिमल रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा देखील चित्रपट धमाका करताना दिसला. अॅनिमल चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड असे प्रेम मिळाले. अॅनिमल या चित्रपटाचे बजेट हे 200 कोटी होते. चित्रपटाने 537.27 कोटींची कमाई केली. या चित्रपटाला म्हणजेच 168.63 टक्के परतावा मिळाला आहे.

12th Fail या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर विक्रांत मॅसी यांचा चित्रपट 12th Fail आहे. या चित्रपटाचे बजेट हे 20 कोटी होते. या चित्रपटाने मोठा धमाका केला. या चित्रपटाने तब्बल 51.93 कोटींची कमाई केली. म्हणजेच या चित्रपटाला 159.65 टक्के परतावा मिळाला आहे. खरोखरच या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठे क्रेझ बघायला मिळाले.

OMG 2 अक्षय कुमार याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून काही खास धमाका करू शकत नाहीत. मात्र, याला ओएमजी 2 हा चित्रपट अपवाद ठरलाय. या चित्रपटाने चांगला परतावा मिळवला आहे. या चित्रपटाचे बजेट हे 65 कोटी होते. या चित्रपटाने 150 कोटींची कमाई केली. म्हणजेच चित्रपटाने 130.76 टक्के परतावा मिळवला आहे.