लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचे लवकरच होणार अनावरण!

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचे लवकरच अनावरण करण्यात येणार असल्याची माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली आहे. सांगलीतील स्टेशन चौक येथे महापालिकेच्या वतीने पुतळ्यासाठी अठरा लाख आणि चाळीस लाख सुशोभित राहण्यासाठी खर्च करून लोकनेते राजारामबापू पाटील यांचा पूर्ण आकृतीबंध पुतळा उभारण्यात येणार आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आले असून दोन दिवसात अनावरणाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

सांगलीत पुतळा आणल्यानंतर महापालिका प्रशासन आणि माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी तसेच माजी नगरसेवक युवराज गायकवाड, सुरेश बंडगर यांच्या उपस्थितीत पुतळा बसविण्यात येणार आहे.