प्रत्येकजण हा आपल्या भविष्याचा विचार करून कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक ही करीतच असतात. जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक बाबतीत टंचाई भासू नये. तर प्रत्येक जण हा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच आरोग्यासाठी पैशाची बचत ही करीतच असतात.
देशातील काही बँकांना मुदत ठेवीवर ग्राहकांना नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून काही बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे नवीन वर्षांत बँकांमध्ये मुदत ठेव करणाऱ्या ठेवीदारांना अधिक कमाई होईल.
त्यांच्या गुंतवणुकीवर त्यांना अधिक परतावा मिळेल. कोरोना काळात व्याजदरात कपात झाली होती. आता ग्राहकांना वाढीव व्याजदराचा फायदा होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग पाचव्यांदा रेपो दर स्थिर ठेवला आहे. हा रेपो रेट 6.5 टक्के आहे.
तरीही FD वरील व्याजदरात बँकांनी वाढ केली आहे. SBI सह देशातील 7 मुदत ठेवीवरील व्याज दरात वाढ केली. काही बँकांचे एफडीवरील व्याजदर 8-9 टक्क्यांवर पोहचला आहे.
भारतीय स्टेट बँक (SBI FD Rates)
भारतीय स्टेट बँकेने मुदत ठेववरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन वर्षांचे ग्राहकांना गिफ्ट दिले आहे. वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडीवरील व्याज दरात 50 बेसिस पॉईंट म्हणजे 0.50 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
- 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3.50 ते 7 टक्के व्याज
- नवीन व्याजदर हा 2 कोटी रुपायंपेक्षा कमी एफडींसाठी आहे
- बँकेने खास अमृत कलश एफडीला मुदत वाढ दिली आहे
- 31 मार्च 2024 पर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येईल
- 400 दिवसांच्या योजनेत 7.10 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज
बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda FD Rates)
- कमी कालावधीच्या मुदत ठेवीवर 1.25 टक्क्यांची वाढ
- बँकेने 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर 3 टक्क्यांहून 4.25 टक्क्यांपर्यंत व्याज वाढवले
- 15 ते 45 दिवसांच्या एफडीवर व्याजदरात 1 टक्के वाढ केली. ते 4.5 टक्के झाले
एक्सिस बँक (Axis Bank FD Rates)
- बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवीवरील व्याजदरात बदल केला
- नवीन व्याजदर 26 डिसेंबर 2023 रोजीपासून लागू झाले आहे
- या नवीन बदलामुळे बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 3 ते 7.10 व्याज देत आहे
युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India FD Rates)
- बँकेने विविध कालावधीच्या एफडीवर 0.25 टक्क्यांची वाढ केली
- 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीतील एफडीवर 3 ते 7.25 टक्के व्याज
- 399 दिवसांच्या मुदत ठेवीवर सर्वाधिक 7.25 टक्के व्याज
- ज्येष्ठ नागरिकांना यापेक्षा अधिक व्याजदर मिळेल
- डीसीबी बँक (DCB Bank FD Rates)
- खासगी क्षेत्रातील DCB बँकेने नुकतीच मुदत ठेव योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे
- 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.75 ते 8 टक्क्यांपर्यंत व्याज
- ज्येष्ठ नागरिकांना 4.25 ते 8.60 टक्के रिटर्न मिळेल