‘या’ जंगलाला म्हणतात पृथ्वीचे फुफ्फुस, तुम्हाला माहित आहे का नाव?

झाडे आणि वनस्पतींशिवाय पृथ्वीवरील मानवी जीवनाची कल्पनाही करता येत नाही, त्यांच्याचमुळे आपल्याला जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन मिळतो ज्यामुळे आपण श्वास घेऊ शकतो. भारतात वाहणाऱ्या जवळजवळ सर्व नद्या हिमालयातून उगम पावतात. पण तुम्हाला त्या नदीबद्दल माहिती आहे का जी हिमालयातून उगम पावूनही भारताकडे नाही तर चीनकडे वाहते? अ‍ॅमेझॉनचं जंगल सुमारे ५५ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेलं आहे. हे जंगल इतकं विशाल आहे की, ते एकटं स्वतःच अनेक देशांपेक्षा मोठं आहे. अ‍ॅमेझॉन वन जगाच्या सुमारे 20% ऑक्सिजनचे उत्पादन करते. त्यामुळे याला पृथ्वीची फुफ्फुसे (Lungs of the Earth) असं म्हटलं जातं. तेथील झाडं आणि वनस्पती कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतात.

अ‍ॅमेझॉनमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पती, पक्षी, कीटक, सरीसृप आणि प्राणी प्रजाती आढळतात. अनेक प्रजाती या फक्त इथंच आढळतात – म्हणजे त्या स्थानिक आहेत. अ‍ॅमेझॉनचे जंगल पृथ्वीच्या हवामान समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हे जंगल पावसाचं प्रमाण, तापमान नियंत्रण, आणि आर्द्रता सांभाळण्याचं काम करतं. शेतीसाठी जमीन मिळवण्यासाठी, सोया आणि गोवंश पालनासाठी मोठ्या प्रमाणावर अ‍ॅमेझॉनची वृक्षतोड केली जात आहे. वाढती वस्ती आणि औद्योगिक प्रकल्प: खाणकाम, रस्ते, धरणं यामुळे जंगलातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. वन्यजीवांचे अस्तित्व संकटात: अन्नसाखळी बिघडत असून अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अ‍ॅमेझॉनचं जंगल हे केवळ दक्षिण अमेरिकेसाठी नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीच्या जीवनचक्रासाठी अत्यावश्यक आहे. त्याचं रक्षण करणं म्हणजे स्वतःचं आणि भविष्यातील पिढ्यांचं जीवन सुरक्षित करणं होय.