थर्टी फर्स्टला ताव मारा चिकन दम बिर्याणीवर !

आज वर्षाचा शेवटचा दिवस सगळीकडे पार्ट्यांचे आयोजन केलेले आहे. अनेक जण थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी विविध ठिकाणी फिरण्यास जातात. तर अनेक जण मांसाहारी जेवणावर ताव मारताना दिसतात. तर घरच्या घरी तुम्ही चिकन दम बिर्याणी बनवून थर्टी फर्स्ट साजरा करू शकता. तर आज तुम्हाला चिकन दम बिर्याणी कशी बनवायची याची स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगणार आहे. 6 लोकांसाठी बिर्याणी बनविताना किती प्रमाणात घटक घ्यावे जाणून घेऊ.

घटक

1 किलो चिकन, 4 चमचे लाल तिखट, 4 चमचे आले-लसूण पेस्ट, 1 वाटी दही,

चिकन बिर्याणी गरम मसाला मध्ये

२ तेज पत्ता, २ जावित्री, दोन मोठी मसाला वेलची, चार हिरवी वेलची, सात ते आठ काळीमिरी, पाच ते सहा लवंगा, एक दालचिनीचा तुकडा, जीरे , दोन चक्रीफुल, 4 वाट्या अख्खा बासमती राइस किंवा बिर्याणी राईस, 1 चमचा जीरे पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 वाटी

कांद्याचा बरिस्ता-६ मोठे कांदे, 2 टोमॅटो, अर्धी जुडी पुदिना, 1/2 जुडी कोथिंबीर, दोन चमचे केवडा वॉटर

चिकनला मॅरीनेट करताना

1 पाकीट चिकन बिर्याणी मसाला, 6 ते सात केशर काड्या गरम दूधात भिजत टाकाव्यात

खायचे कलर हिरवा ऑरेंज कुकिंग

सस्टेप 1

पहिल्यांदाच चिकनला मॅरीनेट करून ठेवा. चिकन स्वच्छ धुऊन घ्या याला दही लावून घ्या लाल तिखट आले-लसूण पेस्ट पुदिना कोथिंबीर ची पेस्ट केवडा वॉटर एक चमचा अख्खे गरम मसाले वरील साहित्यात पैकी अर्धे गरम मसाले चिकन मध्ये टाकावे हळद लाल मिरची पावडर जीरा पावडर धने पावडर दोन चमचे चिकन बिर्याणी मसाला हे सर्व साधारण एक तास लावून मॅरिनेट करून ठेवावे

स्टेप 2

बासमती तांदूळ धुवून ठेवावा

स्टेप 3

एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवावे त्यामध्ये वरील गरम मसाल्यातील खडे मसाले गरम पाण्यात टाकून पाण्याला उकळी आल्यावर त्यात मीठ घालावे आणि तांदूळ शिजायला ठेवावे

स्टेप 4

तांदूळ 60 टक्के शिजवून घ्यावा मध्येमध्ये चमच्यांनी खालीवर करावा 60 ते 70 टक्के तांदूळ शिजल्यानंतर चाळणीत किंवा परातीत काढून त्यावर तेल सोडावे तांदळाचे भाग करून आवडत असल्यास हिरवा कलर ऑरेंज कलर लावून घ्यावा दुधामध्ये केसर भिजत टाकावे याचा मस्त ऑरेंज कलर येतो

स्टेप 5

कुकर मध्ये तेल तापत ठेवावे यामध्ये जीरे टाकून कांदा टोमॅटो परतून घेऊन चिकन टाकावे मीठ घालून दोन शिट्या करा कराव्यात चिकन जास्त शिजवू नये दम देतानासुद्धा ते शिजणार आहेस्टेप 6कांदा स्लाईस मध्ये उभा कापून कढईमध्ये तळून घ्यावा त्याचा बरिस्ता तयार करून ठेवावा

स्टेप 7

आता एका मोठ्या पातेल्यात मध्ये खाली तेल घालावे. यामध्ये कांदे बारीक चिरून परतून घ्यावेत दोन टोमॅटोची पेस्ट करून परतून घ्यावी आले लसूण पेस्ट घालावी हळद लाल तिखट घालावे अर्धी वाटी दही घालावे आणि वरील शिजवलेले अर्ध चिकण घालावे भाताचा थर लावावा वरती पुदिना बारीक चिरून कोथिंबीर बारीक चिरून कांदा चा बरिस्ता घालून पुन्हा चिकन चा एक थर लावावा आणि पुन्हा त्यावर भात घालून वरून केशर चे दुध घालावे पुदिना कोथिंबीर बारीक चिरून आणि वरून कांद्याचा बरिस्ता घालून झाकण ठेवून बारीक गॅसवर बिर्याणी दम द्यावा.

स्टेप 8

बिर्याणीला दम देताना खाली तवा ठेवावा आणि तवा वर पातेले ठेवून बिर्याणीला दहा ते पंधरा मिनिटं छान दम द्यावास्टेप 9गरम बिर्याणी रस्सा आणि कोशिंबीर बरोबर सर्व्ह करावी.