अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन यांचा फायटर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.फायटर पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमाघरांमध्ये गर्दी करत आहेत. अनेक शो हाऊसफुल आहेत. यामुळे कोट्यावधींची कमाई झाली आहे.
फायटर सिनेमाने आतापर्यंत कोट्यावधींचा गल्ला कमावला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 22.5 कोटींची कमाई या सिनेमाने केली आहे.दुसऱ्या दिवशी फायटरने 39 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत मागच्या 3 दिवसात फायटरने 90 कोटींपेक्षा जास्तीचा गल्ला जमवलाय.
आज रविवार आहे. सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे प्रेक्षक सिनेमाघरात जात सुट्टी इन्जॉय करू शकतात. त्यामुळे आज दिवसभरात 100 कोटींचा आकडा हा सिनेमा पार करू शकतो, असा अंदाज आहे.