२०२४ मध्येही नवीन वर्षात टीम इंडिया किती सामने खेळणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

भारतीय क्रिकेट संघ २०२३ या वर्षात भारतीय संघाने क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली, पण पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात त्यांना यश आले नाही. नवीन वर्षात भारतीय संघाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही कसोटी मालिका भारत जिंकू शकणार नाही, कारण या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने पहिली कसोटी जिंकली आहे. त्यामुळए जरी भारताने दु,री कसोटी मालिका जिंकली तरीही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका न जिंकण्याचा हा रेकॉर्ड भारताच्या नावे कायम राहणार आहे. त्यामुळे आता टीम इंडिया २०२४ साली कोणकोणत्या संघांविरुद्ध खेळणार आहे, चला जाणून घेऊया टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक.

भारतीय संघ नवीन वर्षातील पहिली मालिका अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान तीन टी-२० सामन्यांची ही मालिका खेळवली जाणार आहे. २०२४ मध्ये भारतीय संघ यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये होणारा टी-२० विश्वचषकही खेळणार आहे. टी-२० विश्वचषकाशिवाय अफगाणिस्तान, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबतही वेगवेगळ्या फॉरमॅटच्या मालिका खेळवल्या जाणार आहेत.

भारतीय संघाचे २०२४ मधील वेळापत्रक

तारखामालिकाठिकाणसामने
१० डिसेंबर २०२३ ते ७ जानेवारी २०२४दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका३ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामने
११ ते १७ जानेवारीअफगाणिस्तानभारत३ टी-२० सामने
२५ जानेवारी ते ११ मार्चइंग्लंडभारत५ कसोटी सामने
४ ते ३० जूनICC टी-२० विश्वचषक २०२४वेस्टइंडिज/युएसएटी-२० सामने
जुलै (तारखा जाहीर होणे बाकी)श्रीलंकाश्रीलंका३ वनडे, ३ टी-२० सामने
सप्टेंबर (तारखा जाहीर होणे बाकी)बांग्लादेशभारत२ कसोटी, ३ टी-२० सामने
ऑक्टोबर (तारखा जाहीर होणे बाकी)न्यूझीलंडभारत३ कसोटी
नोव्हेंबर ते डिसेंबर (तारखा जाहीर होणे बाकी)ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया५ कसोटी