शेतकऱ्यांसाठी खूशखबर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा..

राज्यातील (Maharashtra) दुष्काळी (Drought) 40 तालुक्यांमधील 1021 मंडळांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे.शेतीशी संबंधित कर्ज(Agriculture Loan) वसुलीस स्थगिती देण्यात आली असून कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. राज्यभरातील 40 दुष्काळी तालुक्यांमधील तब्बल 1021 महसुली मंडळांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या सहकार आणि पणन विभागाने शेतीशी संबंधित कर्ज वसुलीस स्थगिती देत, कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश काढले आले आहेत त्यामुळे दुष्काळी पट्ट्यामधील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील मराठवाड्यासह इतर विभागात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे याचं अनुषंगाने सरकारने या 40 दुष्काळी तालुक्यातील 1021 महसुली मंडळातील शेतकऱ्यांच्या शेती संबंधित कर्ज वसुलीस स्थगिती देत कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे काढले आहेत.या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.