अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन त्यांच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहेत. गेल्या काही काळापासून त्यांच्यातील बेबनावाच्या, घटस्फोटाबद्दलच्या अनेक अफवा समोर येत आहेत. नुकतीच ऐश्वर्या दुबईत एका पुरस्कार सोहळ्यासाठी गेली होती.आराध्याने शिवा राजकुमार याला वाकून नमस्कार केला. तो पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं. त्यानंतर आराध्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झालाय, ती खूप लहान असतानाचा हा व्हिडीओ असून, ऐश्वर्याच्या कडेवरून उतरून तिने कुटुंबातील सदस्याला वाकून नमस्कार केला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिच्या संस्काराबद्दल टिपण्णी केली.
आराध्या बच्चन सिनियर्ससोबत खूप छान वागते. कोणताही मोठा कार्यक्रम असो किंवा पार्टी…ती खूप आदराने वागते. मात्र, एका व्हिडिओमुळे तिला यापूर्वी खूप ट्रोल करण्यात आले होते. पण खरी परिस्थिती वेगळीच होती. ते पाहून अमिताभ बच्चन यांच्या नातीच्या संस्कारांचे सर्वजण कौतुक करत आहेत. आराध्याचा व्हिडीओ पाहून अनेकांना बिग बी यांचा ‘सूर्यवंशम’ चित्रपट आणि त्यातील एक संवादही आठवला… ‘संस्कार उम्र से बड़े हैं इसके…! तर दुसऱ्या युजरने लिहीलं की, बच्चन कुटुंबाने नातीवर किती चांगले संस्कार केलेत. अनेकांनी ऐश्वर्याचे कौतुकही केले. ” ती तिच्या मुलीला सगळीकडे जाते पण आराध्या इतर स्टार किड्सच्या तुलनेत खूप चांगली आहे ” असे म्हणत अनेकांनी मायलेकीचे कौतुक केले.