अंडर १९वर्ल्डकपची फायनल आज टीम इंडिया आणिऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑसी संघानं रोहित-विराटच्या हातून खेचून नेलेल्या वर्ल्डकपचा बदला घेण्याची संधी भारतीय युवा संघाकडे आहे. त्यामुळे टीम इंडियाकडून 140 कोटी भारतीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. अशातच टीम इंडिया कांगारूंना धूळ चारून चीतपट करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच फायनलपूर्वी भारतीय युवा संघाचा स्टार विकेटकिपर आणि फलंदाज अरावेली अवनीश राव यांनं धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. धोनी सर आणि सीएसकेला गौरव वाटावा असं काहीतरी मला करायचं आहे, असं अरावेली अवनीश राव म्हणाला आहे.
अरावेली अवनीश रावनं ऑस्ट्रेलिया विरोधात रविवारी खेळवण्यात येणाऱ्या अंडर-19 वर्ल्डकपमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवण्यासाठी सज्ज आहे. पण त्यानं वर्ल्डकप फायनलनंतरच्या त्याच्या प्लानबाबतही सांगितलं. वर्ल्डकप फायनलनंतर अरावेली अवनीश राव पिवळ्या जर्सीत धोनीला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करण्याच्या तयारीत आहे.
भारतीय संघाचा विकेटकीपर-फलंदाज अरावेली अवनीश राव, जो अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे, तो अशा काही खेळाडूंपैकी एक आहे ज्यांच्याकडे इतक्या लहान वयात आयपीएल करार झाला आहे. त्याला महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने गेल्या महिन्यात आयपीएल लिलावात 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केलं होतं.